येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले, 4219 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

758

परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणात 98 टक्के पाणी साठा झाला असून पूरनियंत्रण करण्यासाठी येथील धरणाचे दोन दरवाजे सायंकाळी अर्धा मीटरने उचलून 4219 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. तत्पूर्वी सकाळी 7 अतिरिक्त पाणी वीजनिर्मिती केंद्रातून सोडण्यात आले.

येथील वीजनिर्मिती केंद्र सुरू केले असून बुधवार, 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता खडकपूर्णा धरणातून सोडलेले अतिरिक्त पाणी पूर्णा नदीत सोडले आहे. यामुळे आता येलदरी जल विद्युत केंद्र कार्यान्वित झाले आहे. 22.5 मेगाव्याट एवढी वीज निर्मिती सुरू झाली आहे. अत्यंत कमी खर्चात तयार होणार्‍या या विजेमुळे भारनियमन कमी करण्यास मदत मिळणार असून ऊर्जा विभागाला दररोज अंदाजे 17 ते 18 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पूर्णा प्रकल्पावर एकूण 3 धरणे आहेत. हे तिन्ही धरणे यावर्षी पूर्ण क्षमतेने भरणार आहेत. त्यामुळे यावर्षी लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता देखील मिटणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या