विहीरीत पडला बिबट्या, घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल

जिंतुर तालुक्यातील चारठाणा गावापासुन जवळच असलेल्या वाघी धानोरा ते वडी शिवारातील एका पोलीस पाटलाच्या शेतातील विहरीजवळ बिबट्याचे पिल्लू मंगळवार सांयकाळच्या सुमारास पाय घसरून पडले. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, वडी येथील पोलीस पाटील संजय पवार यांच्या शेतातील विहीरीत पाण्याच्या शोधात एक बिबट्याचे पिल्लू आले. यावेळी अचानक पाय घसरून विहिरीत पडले. त्यानंतर जवळपासच्या शेतकर्‍यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर या शेतकर्‍यांनी भ्रमणध्वनीवरून गावात ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीस पाटील संजय पवार यांनी बामणी पोलीस ठाणे व वनखात्याला ही माहिती कळविली. परंतु वनअधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ येण्यास असमर्थता दर्शविली. बिबट्याला पाहण्यासाठी गावातील नागरिकांची तोबा गर्दी जमा झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत एकही कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आले नव्हते. रात्री उशिरा वनविभागाचे पथक या ठिकाणी दाखल झाले असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या