
कोरोना विषाणुच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात आता तासागणिक कोरोनाबाधित रुग्ण आढळू लागले आहेत. आज दिवसभरात शहरासह जिल्ह्यात १२२ रुग्ण आढळून आले आहेत. तर ३ कोरोनाबाधितांचा परभणीत मृत्यू झाला. तर परजिल्ह्यातील रूग्णालयात तीघांचा मृत्यू झाला आहे. असा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
परभणी शहरात ८७, जिंतूरात ११, सेलूत १, पालममध्ये १३, गंगाखेड ६,सोनपेठात २, पाथरीत २ असे एकूण १२२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.
४० कोरोनामुक्त व्यक्तींना डिस्चार्ज
जिल्ह्यात ४० कोरोनामुक्त व्यक्तींना रुग्णालय प्रशासनाद्वारे सर्व सोपस्कार पूर्ण करीत डिस्चार्ज दिला. रविवारी परभणीत ८७, जिंतूर ११, सेलू १, पालम १३, गंगाखेड ६, सोनपेठ २, पाथरी २ असे एकूण १२२ कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आले. आज रोजी कक्षात भरती रुग्ण ८५० आहेत. आजपर्यंत ७८ कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रविवारी सायंकाळपर्यंत म्हणजे गेल्या २४ तासात १२२ एकूण बाधित, एकूण ९७२४ संशयितांचे स्वॅब घेतल्या गेले असून त्यातील ७९३४ स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर १५४१ स्वॅब पॉझीटीव्ह आले आहेत. १४९ स्वॅब अनिर्णायक असून ६० स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. ४० स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.






















































