
परभणी शहरातील सरफराज नगर मध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवार 11 जून रोजी सायंकाळी उशिरा सदर तरुणाचा अहवाल आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 92 इतका झाला आहे. त्यापैकी 77 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्याना रुग्णालयातून सुटी सुद्धा देण्यात आली आहे. यापूर्वी 3 रुणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेकडून या सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या युवकाच्या हायरिस्क संपर्कात तीन जण आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला 28 वर्षीय तरुण त्याच्या कळमनुरी येथील दोन मित्रांसोबत 3 जून रोजी मुंबईहून परतला होता. यावेळी त्यांच्या सोबत गाडीचा चालकही होता. परभणीतील तरुण आयटीआयमध्ये बनविण्यात आलेल्या रुग्णालयात गेला. या ठिकाणी त्याची तपासणी करुन क्वॉरंटाईन होण्यास सांगण्यात आले. त्यानुसार हा तरुण 3 ते 9 जूनदरम्यान शहरातील एका खासगी हॉटेलमध्ये राहीला. 10 जून रोजी हा तरुण सरफराज नगरातील त्याच्या घरी गेला. याच दिवशी संध्याकाळी एका मित्राबरोबर चहा पिण्यासाठी घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यावर कळमनुरीला गेलेल्या त्याच्या दोन्ही मित्राचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे समजले. त्यानंतर गुरुवार, 11 जून रोजी सदर तरुण जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी गेला. या ठिकाणी त्याचा स्वब घेण्यात आला. गुरुवारी सायंकाळी या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. .



























































