
परभणी शहरासह जिल्ह्यात सकाळी सूर्यदर्शन झाल्यानंतर दुपारी 2च्या सुमारास ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्या पाठोपाठ काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. मानवत तालुक्यातील रामपुरी येथे वादळी वाऱ्यासोबतच गारा बरसल्या. वनामकृविच्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार 1 मार्च रोजी मराठवाड्यात पाऊस बसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, हा अंदाज खरा ठरला असल्याचे प्रत्यक्षदर्शी चित्रावरून दिसून येत आहे. दिवसभर ऊन, सावली हा खेळ चालू होता.
परभणी जिल्ह्यासह तालुक्यातील सेलू, जिंतूर, गंगाखेड, मानवत, पूर्णा, सोनपेठ या तालुक्यातही तुरळक स्वरुपाचा पाऊस बरसला आहे. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू, हरभरा करडई आदी पीके उभी आहेत. काही पीके काढणीला आली आहेत. एकीकडे शेतकरी पीक काढणीच्या कामास प्रारंभ करत असतानाच दुसरीकडे हवामानात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पूर्वी सोयाबीन आणि कापूस ही नगदी पीके हातची गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. असेच वातावरण राहिले तर पीकांना धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मानवत तालुक्यातील रामपुरी येथे आज गारा पडल्या. जोरदार वादळी वाऱ्यासह गारा पडल्याने रबी पीकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहर फुलोऱ्यात असतानाच या गारामुळे नुकसान झाले. परभणी जिल्ह्याभरात दुपारनंतर एवूâणच ढगाळ वातावरण दिसून आले. सध्या मराठवाड्यात तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. मात्र, दोन दिवसांपासून सायंकाळच्यावेळी जोरदार वारे वाहु लागले आहेत. सायंकाळीच्यावेळी बहुतांष भागात थंडगार वारे वाहु लागले होते. त्यामुळे ढगाळ वातावरणाची स्थिती निर्माण होत असून त्याचा परिणाम म्हणून आज मानवत तालुक्यातील रामपुरी येथे वादळी वाऱ्यासह गारा पडल्या. गारांचा आकार चिंचोक्या सारखा होता.
मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्राच्या विभागाने चार दिवसांपूर्वीच 29 फेबु्रवारी व 1 मार्च या दिवशी काही ठिकाणी वादळी वाNयासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. एरवी हा अंदाज खरा ठरत नसून केवळ अंदाजच राहत असे. प्रथमच हा अंदाज खरा ठरला आहे.




























































