लालपरी महाराष्ट्रात अडकलेल्या कर्नाटक, तेलंगाणाच्या मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

एसटी बसच्या माध्यमातून कर्नाटक राज्यातील सुमारे 40 हून अधिक मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच तेलंगाणा राज्यातील 91 कामगारांना 4 बसमधून महाराष्ट्र-तेलंगाणाच्या सीमेवर सोडण्यात येणार आहे. मोलमजुरी आणि किरकोळ व्यवसायासाठी परभणीत आलेल्या गुजरात आणि तमीळनाडू राज्यातील 85 मजुरांना मंगळवारी महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसमधून राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यात आले होते. या मजुरांना दिवसभर पुरेल एवढे जेवण विविध सेवाभावी संस्थेच्या वतीने देण्यात आले.

परभणीसह जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये किरकोळ व्यवसाय आणि इतर मोलमजुरी करण्यासाठी देशातील अन्य राज्यांमधून मोठ्या प्रमाणात मजूर लोक आलेले आहेत. मात्र,लॉकडाऊनमुळे व्यवसाय, कारखाने आणि कंपन्या बंद पडले आहेत. परिणामी हे लोक बेरोजगार झाले असून, त्यांच्या पुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यातील अनेक परप्रांतीय सध्या परभणी शहराच्या सभोवताल जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारा गृहांमध्ये वास्तव्याला आहेत. या ठिकाणी त्यांना दोन वेळचे जेवण मिळत असले तरी प्रत्येकालाच आपल्या घरची ओढ लागली आहे. त्यामुळे, त्यांच्याकडून वारंवार परतीसाठी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केले जात होते.