परभणीत वीस दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत, मनपाचा दुर्लक्षपणा

237

शहरातील वसमत रोडवरील जलकुंभाजवळील वॉल खराब झाल्यामुळे या प्रभागांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. वसमत रोडवरील अनेक प्रभागात मागील 20 दिवसांपासून नळाला पाणी सोडण्यात आले नाही. त्यामुळे घरामध्ये पिण्याचा पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला आहे. नागरिकांना विकतेचे पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. मनपाने या प्रभागांतील पाणीपुरवठा सुरळीत करून नळाला पाणी सोडावे, अशी मागणी नागरिकांतून होऊ लागली आहे.

परभणी महानगरपालिका काँग्रेसच्या हातात असून जनतेने फार मोठ्या अपेक्षेणे त्यांना निवडून दिले होते. प्रारंभीचे काही महिने आम्ही नवीन आहोत. काही दिवस थांबा चार दिवसाआड पाणी देण्यात येईल, अशा आश्वासनांची खैरात ते सत्ता मिळाल्यानंतर देत होते. परंतु आता सत्ता मिळूनही अडीच वर्ष उलटले तरी जनतेच्या सार्वजनिक पाणीपुरवठ्यामध्ये  कोणताही सकारात्मक बदल ते करु शकले नाहीत. पूर्वी तरी दहा दिवसाआड पाणीपुरवठा होत असे. परंतु आता चक्क १५ दिवसानंतर आणि यावेळी तर 20 दिवस उलटले तरी नळाला पाणी आले नाही. वसमत रोडवरील कृषी सारथी कॉलनी, खानापूर फाटा, वांगी रोड, रामकृष्णनगर अशा अनेक भागात 20 दिवसांनंतर नळाला पाणी आले नसल्याने जनतेतून चिंता व्यक्त होत आहे. 15 दिवसाआड तरी पाणी नळाला यावे, अशी अपेक्षा व्यक्त करून सामान्य नागरिक चिडीचूप बसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या