
कोरोना विरोधाच्या लढाईत मदतीचे हात पुढे करताना भाजपाची सुरु असलेली चमकेशगिरी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. आता भाजपाच्या नेत्यांनीच त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. पक्षाचे नेते, ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी ‘आलू एक दर्जन, दयालू दोन दर्जन’ अशा तिखट शब्दात त्यांनी ही ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे.
आलू एक दर्जन
दयालु दो दर्जन… pic.twitter.com/vi96PZDo6z— Paresh Rawal (@SirPareshRawal) April 16, 2020
कोरोनाविरोधात लढाई लढण्यासाठी गरजवंतांना दिल्या जाणाऱया मदतीत भाजप नेते चमकेशगिरी करत आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूरचे खासदार सत्यदेव चौधरी यांनी गरजूंना बटाटे वाटप केले होते. हे वाटप करताना त्यांनी फोटो काढला होता. हा फोटो भाजपचे नेते परेश रावल यांनी गुरुकारी संध्याकाळी ट्विट करीत या वाटपाचा खरपूस समाचार घेतला आहे. या वाटपादरम्यान अनेकांनी मास्क आणि ग्लोव्हजदेखील घातलेले नाहीत.






















































