तंत्रज्ञान अवश्य शिका, पण त्याचे गुलाम बनू नका; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

396

जगातील वेगवान विकासाच्या युगात नवे तंत्रज्ञान शिकण्याची आणि ते आत्मसात करण्याची नितांत आवश्यकता आहे. पण तंत्रज्ञानाचे गुलाम बनू नका आणि त्याचा दुरुपयोग करू नका, असा वडीलकीचा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात बोलताना विद्यार्थ्यांना दिला.

वीज, पाणी या अत्यावश्यक गोष्टींचा योग्य वापर करणे आणि घरातील अन्य व्यवस्थांचा यथोचित उपयोग करणे ही देखील देशभक्तीच आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मेक इन इंडिया’च्या वस्तू खरेदी केल्यास त्याचा फायदा थेट देशाला होतो. ते आपले कर्तव्य समजून योग्यरीतीने पार पाडा. विद्यार्थी आणि माझा संवाद हा ‘हॅशटॅग विदाऊट फिल्टर’ अशा स्वरूपाचा असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात 20 हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातील 1050 विद्यार्थ्यांची निवड निबंध स्पर्धेद्वारे करण्यात आली होती.

स्मार्टफोनचा वापर अवश्य करा, पण त्यात गुंतून आपला बहुमूल्य वेळ फुकट घालवू नका. त्याऐवजी अभ्यास मन लावून करा. यश तुमच्या मागे येईल- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विद्यार्थ्यांचा वेळ कशाला फुकट घालवता?

आता विविध बोर्डांच्या 10वी 12वीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा स्थितीत आपण विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोकळे सोडायला हवे. अशा वेळेत निरर्थक चर्चासत्र घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांचा आणा स्वतःचाही किमती वेळ कशाला वाया घालवत आहेत, असा संतप्त सवाल काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या