मुलगा झाला … परिणिती चोप्रा झाली आई

बॉलीवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा खासदार राघव चड्ढा आई-बाबा झाले आहेत. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या जोडप्याने दिवाळीच्या मुहूर्तावर घरी गोंडस बाळाचे आगमन झाल्याची शुभवार्ता दिली. राघव चड्ढा यांनी पोस्टमध्ये लिहिलंय, ‘आमच्या घरी गोंडस बाळाचे आगमन झालेले आहे. खरंच यापूर्वीचे आयुष्य कसे होते हे आठवत नाहीये. त्याच्या येण्याने आयुष्य खऱया अर्थाने परिपूर्ण झालंय. आधी आम्ही दोघं एकमेकांसाठी होतो आणि आता आमच्याकडे सर्वकाही आहे.’