राहुल गांधी व मोदींमध्ये हत्ती आणि मुंगी एवढा फरक

सामना ऑनलाईन । वाराणसी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसी लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित होते. मोदींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिरोमणी अकाली दलाचे नेते व पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थानच्या पंतप्रधान पदाच्या उमेवारावरून राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. हिंदुस्थानातील जनतेने आपला पंतप्रधान कोण असावा याबाबत विचार करायला हवा. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात हत्ती आणि मुंगी एवढा फरक आहे असे म्हटले आहे.