पूर्वसूचनेशिवाय वीजपुरवठा खंडीत, महावितरणविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र संताप

892

महावितरण कंपनीकडून कुठलीही पूर्वसूचना न देता परळीत सतत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कुठलीही पूर्वसूचना न देता गेल्या काही दिवसांपासून शहराचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे, यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

शहरातील विद्युत केंद्रामुळे होणारे प्रदूषण नागरिकांना सहन करावे लागते. या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त असतानाच या खंडित वीजपुरवठ्याने बाल-अबाल,वयोवृद्ध नागरिक हैराण झाले आहेत.

शहरातील औद्योगिक वसाहतीत तर नेहमीच वीजप्रवाह खंडीत असतो. आधीच बाजारपेठ थंडवलेल्या आहेत. यातच शहराच्या अर्थव्यवस्थेत हातभार लावणाऱ्या औद्योगिक वसाहतीत नियमीत वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसात मेंटनन्सच्या नावाखाली अवेळी खंडित होणारा वीजपुरवठा याकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता लक्ष घालण्याची चर्चा नागरिकांतून होत आहे.

महावितरणचे ग्राहक तक्रार क्रमांक. असतात नॉट रिचेबल

लाईट गेल्यास तक्रार करण्यासाठी महावितरण कडून दिले गेलेले नंबर रात्री बेरात्री बहुतेक वेळा बंदच असतात. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास ग्राहकांनी संपर्क करायचा तरी कुठे असा प्रश्न परळीकरांसमोर असतो. लाईट गेल्यावर ग्राहकांनी कुठे फोन करावा यासाठी आता महावितरण ने आपले चालू असलेले अधिकृत नंबर जाहीर करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या