ससंदेत SIR मुद्द्यावर विरोधक आक्रमक; दोन्ही सभागृहांचे कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा आठवडा आजपासून सुरू झाला आहे. बिहार मतदार यादी सुधारणेवरून सुरू असलेला वाद संसदेत आणखी तापला आहे. विरोधक या मुद्द्यावर आक्रमक असताना लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. बिहार मतदार यादी सुधारणेच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पहिल्या तीन आठवड्यांत विस्कळीत झाले आहे. गदारोळात काही विधेयके मंजूर झाली आहेत, परंतु त्यावर सविस्तर चर्चा झालेली नाही. आता संसदेत SIR वरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील वाद आणखी वाढला आहे.

अंतराळवीर शुभांशू शुक्लाच्या अंतराळ मोहिमेच्या यशावर संसदेत विशेष चर्चा होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सर्व पक्षांना या चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. शुभांशू शुक्ला यांच्या यशस्वी अंतराळ प्रवासावर आज संसदेत विशेष चर्चा होणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांना कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि विज्ञान पथक, इस्रो टीम यांचे अभिनंदन करण्यासाठी एकमताने पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

बिहार एसआयआरवर विरोधकांच्या जोरदार गदारोळात, मंत्री पियुष गोयल यांनी जन विश्वास विधेयक मांडले. पियुष गोयल यांनी हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडला, जी पुढील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात आपला अहवाल सादर करेल. गोंधळादरम्यान हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही गोंधळादरम्यान व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक सादर केले. दरम्यान, गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. याआधी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. मात्र, कामकाजाला सुरुवात होताच गदारोळ कायम राहिल्याने कामकाज 2 वाजेपर्यंत स्थिगत करण्यात आले.

राज्यसभेचे कामकाज सुरू होताच, नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. ते मध्य प्रदेशचे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य देखील होते. तमिळनाडूचे रहिवासी असलेले एल गणेशन यांचे १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी चेन्नईतील रुग्णालयात निधन झाले. संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या आठवड्याची सुरुवात राज्यसभेत गोंधळाने झाली. गोंधळामुळे वरिष्ठ सभागृहाचे कामकाज २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.