पारनेर- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्यातील पवळदरा, पोखरी येथे नववी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. पीडितेवर अत्याचार करणाऱ्या अविनाश वामन मधे (20) या आरोपीविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यास अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी मधे हा दुचाकी चोरीतील आरोपी असल्यची माहितीही पुढे आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची पंधरा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.

16 वर्षीय पीडितेने पारनेर पोलीस ठाण्यात आपल्यावर झालेल्या अत्याचाराची कहाणी पोलसांपुढे कथन केली. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार 22 नोहेंबर रोजी पीडिता तिच्या मैत्रीणीसोबत पवळदरा येथून शाळेत निघाली असता पवळदरा घाटामध्ये आरोपी अविनाश दुचाकीवरून तेथे आला. पीडितेस बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याने तिचे अपहरण केले. अज्ञात ठिकाणी नेऊन पीडितेवर अविनाश याने तिच्यावर बलात्कार केला. आरडा ओरड केल्यास, कोणाकडे तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकीही अविनाश याने पीडितेस दिली. घरी आल्यानंतर पीडितेने आपल्या पालकांना झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर पालक तिला पोलीस ठाण्यात घेउन गेले. पोलिसांपुढे कथन करण्यात आलेल्या माहितीनुसार अविनाश याच्यावर बलात्कार, बाललैंगिक अत्याचारासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अविनाश यास अटक केली आहे.

दरम्यान, गेल्या पंधरा दिवसांत तालुक्यात अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचाराची ही तिसरी घटना असून करंदी येथेही चुलत दिराकडून भावजयीचा विनयभंग करण्यात आला आहे. अल्पवयीन मुली तसचे महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांमुळे तालुक्यात चिंता व्यक्त करण्यात येत असून या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर उपाय योजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.