माझ्याकडे ती फाइल आलीच नाही आणि आमच्याकडून ती परवानगी दिली गेली नाही, पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी निलंबित तहसीलदारांची प्रतिक्रिया

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटी रुपयांना खरेदी केली. तसेच स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. यामुळे खडबडून जागे झालेल्या मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ प्रभावाने तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच चौकशी समिती सुद्धा स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणी निलंबीत तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणात आतापर्यंत तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या व्यतिरिक्त हवेली क्रमांक-3 चे दुय्यम उपनिबंधक रविंद्र तारू यांचेही निलंबन करण्यात आले आहे. या जमीन घोटाळ्यामुळे प्रकाशझोतात आलेले तहसलीदार सूर्यकांत येवले यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. मी व्यवहार केलेला नाही, त्याबद्दल मला माहिती नाही. आमच्याकडून परवानगी दिली गेली नाही. महार वतनाची ती जमीन होती, दुय्यम निबंधकासोबत व्यवहार झाला आहे. त्याबद्दल मला माहिती नाही.” असे म्हणत निलंबनाचा आदेश अजून मिळाला नसल्याचे सूर्यकांत येवले म्हणाले आहेत.

हात लिहिता राहिला पाहिजे… रुग्णालयातून संजय राऊत यांची पोस्ट, फोटो व्हायरल

“माझ्याकडे ती फाईल आलीच नाही. माझ्याकडून परवानगी दिली नाही. माझ्यावर कारवाई का केली हेच अजून मला माहिती नाही. मला अजून निलंबनाचा आदेश मिळाला नाही. त्यामुळे मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. काल सुट्टी होती. त्यामुळे या प्रकरणी कोणीच माहिती मागितली नाही. तो दस्तच अजून मला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही”, असे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले म्हणाले आहेत.

मुलाच्या नावाने पुण्यात 40 एकर सरकारी जमीन हडपणाऱ्या अजित पवारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा! काँग्रेसची मागणी