संभाजीनगर – 11 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अंशत: लॉकडाऊन; शनिवार, रविवार शहर पूर्ण बंद

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने 11 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान शहरात अंशत: लॉकडाऊन लागु केला आहे. यामध्ये प्रत्येक शनिवार आणि रविवारी कडेकोट लॉडाऊन असणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणुन पुन्हा शाळा महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय लॉकडाऊनच्या कालावधीत लग्न समारंभ, सभा, आंदोलनांवर बंदी घालण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या संदर्भात माहिती देतांना सांगितले की, अंशत: लॉकडाऊनमध्ये व्यापार, बाजारपेठा, हॉटेल, परमीटरुम सुरु असणार आहेत, मात्र रात्री 9 वाजता बाजारपेठा बंद होतील. कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना घराघरातील कुटुंबांना प्रादुर्भाव होत असल्याने यावर उपाययोजना म्हणुन लग्न समारंभावर बंदी घालण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, सर्व प्रकारचे आंदोलने यावर बंदी घालण्यात आली आहे. या अंशत: लॉकडाऊनमध्ये शहरातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अंशत: लॉकडाऊन दरम्यान दर शनिवारी आणि रविवारी पुर्ण लॉकडाऊन असणार आहे. या दोन दिवसात संपुर्ण बाजारपेठा, हॉटेल, परमीटरुम, व्यवसाय बंद राहतील. भाजी बाजार, प्रवासी सेवा, औषधी दुकाने, वैद्यकीय सेवा, उद्योग मात्र सुरु राहतील. त्यांना कोरोनाच्या नियमाचे मात्र पालन करणे बंधनकारक असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या