भाजपाने वाट लावलेल्या आंबाजोगाईवर, भगवा फडकावयाचा आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अंबाजोगाई

शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशावरून येणारी निवडणूक स्वबळावर लढवून विधानसभेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आदेश देत आमदार ठोंबरेंनी मतदार संघाची वाट लावली असुन शिवसेना केज मतदार संघात पुर्ण ताकतीने लढणार असे मत केज विधानसभा मतदार संघाचे संपर्कप्रमुख अनिल विचारे व जिल्हाप्रमुख सचीन मुळूक यांनी व्यक्त केले आहे.

मराठवाडा संपर्कनेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख  सुधीरजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांच्या अध्यक्षतेखाली केज विधानसभा संपर्कप्रमुख मा.अनिल विचारे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी शासकीय विश्रामगृह केज येथे शिवसेना पदाधिकारी बैठक संपन्न झाली

सदरील बैठकीत पक्षबांधणी, बुथप्रमुख सदस्य नोंदणी व आंदोलन व आगामी निवडणुकी विषयी सविस्तर  चर्चा नुतन केज विधानसभा संपर्क प्रमुख अनिल विचारे यांनी पदाधिकार्‍यांसोबत केली. केज विधानसभा वर भगवा फङकावयचा असल्याने सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी  कामाला लागावे असे आवाहन  करण्यात आले.

यावेळी  जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी गट तट बाजुला करुन मतदार संघावर भगवा फडकवण्याचे पक्षप्रमुखाचे स्वप्न पुर्ण करण्याचे आदेश मानुन कामाला लागण्याचे आवाहन केले. यावेळी प्रास्ताविक तालुका प्रमुख गणेश मोरे यांनी केले. यावेळी केज मतदार संघाचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब अंबुरे, केज ता.प्र.रत्नाकर शिंदे,व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीधर गरड तर आभार गजानन मुडेगावकर यांनी मानले.