चला बसूया आणि मजा करूया! कोरोना काळात पार्ट्या झोडणाऱ्या जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाने जगभरात प्रकोप माजवला आहे. ब्रिटनलाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी आणि साथ रोखण्यासाठी सर्व देश कसोशीने प्रयत्न करत आहेत. मात्र, कोरोना काळात पार्ट्या झोडून जनतेची दिशाभूल करणारे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पदावरून पायउतार व्हावे, अशी मागणी आता ब्रिटनमध्ये जोर धरत आहे. जॉन्सन यांनी पायउतार व्हावे, यासाठी आता त्यांच्यावर दबाव वाढत आहे.

ब्रिटनमधील सुमारे दोन तृतीयांश नागरिकांनी जॉन्सन यांनी आता पंतप्रधानपद सोडावे, अशी मागणी केली आहे. ब्रिटनमध्ये लावण्यात आलेले लॉकडाऊन आणि कोरोना काळातील भयानक अनुभव कथन करत जनतेने आणि काही खासदारांनीही ज़ॉन्सन यांनी आता पद सोडावे, अशी मागणी केली आहे. कोरोना संकटाशी देश झगडत असताना डॉन्सन पार्टी झोडण्यात मग्न होते. त्यांनी हे संकट गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जॉन्सन यांनी जनतेची दिशाभूल करत कोरोनाची माहिती लापवून ठेवल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. माजी अॅटर्नी जनरल डॉमिनिक ग्रीव्ह यांनी पंतप्रधानांनावर टीका करत त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

कोरोना काळात सभा, समारंभांना बंदी असूनही या काळात जॉन्सन यांनी अनेक पार्ट्या झोडल्याचे उघड झाले आहे. त्यांनी जनतेवर लॉकडाऊन लादले आणि स्वतः पार्ट्या झोडत होते. जनतेला झालेल्या त्रासाची आणि भयानक अनुभवाची जाणीव जॉन्सन यांना नसल्याचे अनेकांनी सांगितले. कोरोना काळात जॉन्सन यांनी पार्ट्या झोडल्याचे उघड झाल्यावर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. जॉन्सन यांनी झोडलेल्या पार्ट्यांबाबत आता व्हाईटहॉल प्रवर्तकांकडून चौकशी करण्यात येत आहे. तेथील सहा पार्ट्यापैकी चार कार्यक्रमांना जॉन्सन उपस्थित होते. याबाबतच्या चौकशीचा अहवाल पुढील आठवड्यात येणार आहे.

कोविड 19 Beareved Families for Justice Group च्या प्रवक्त्या हन्ना ब्रॅडी यांनी सांगितले की, त्यांनी 20 मे 2020 रोजीतिचे वडील शॉन यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली. माझ्यासाठी ही दोन माणसांची गोष्ट आहे. त्यातील एक 55 वर्षांचे माझे वडील आहेत. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांनी कोरोनाशी मुकाबला करत 42 रात्र व्हेंटिलेटरवर घालवल्या आहेत. तर दुसरा एक माणूस म्हणजे 55 वर्षांचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आहेत. ते या संकटाच्या काळात पार्ट्या झोडत होते.

जॉन्सन यांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यांनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यांच्यामुळेच अनेकांना आपल्या नातेवाईकांना प्राण सोडताना बघावे लागले आहे. तसेच जॉन्सन यांनी लावलेल्या लॉक डाऊनमुळेही अनेकांना संकटांचा सामना करावा लागला आहे. अनेकांनी कोरोना काळातील आणि लॉकडाऊनमधील भयानक आठवणी सांगत जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

ब्रिटनमधील अनेक नेते आणि खासदारांनीही जॉन्सन यांचा पार्ट्या झोडण्याचा विषय उचलून धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. कोरोनाचे कारण पुढे करत त्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी माहिती दडवून ठेवत जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे आता ते अडचणीत आले आहे. त्यांनी विश्वासार्हता गमावल्याने त्यांनी पायउतार व्हावे, असे मत अनेक खासदारांनी व्यक्त केले.

ब्रिटनच्या संसदेतही कोरोनाचा प्रश्न चर्चेत आला होता. त्यावेळी मजूर पक्षाने तातडीचा प्रश्न उपस्थित करत जॉन्सन यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले होते. ब्रिटनमध्ये अनेकजण जीव गमावत आहेत. हे खासदरांनी निदर्शनास आणून दिले होते. एका खायदाराच्या सासूचाही या महामारीत मृत्यू झाला. त्याबाबतचे अनुभव सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पंतप्रधानांनी संसदेची दिशाभूल केली असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे मत स्कॉटिश नेते डग्लस रॉस यांनी व्यक्त केले.

मजूर पक्षाचे नेते केयर स्टार्मर म्हणाले की, “बोरिस जॉन्सन, मूळ समस्येपासून जनतेचे लक्ष विचलीत करत आहेत. कोरोना काळात त्यांनी पार्ट्या झोडल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी देशाची दिशाभूल केली आहे. त्यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली असती तर मोठी जीवीतहानी टाळता आली असती, असे त्यांनी सांगितले. जॉन्सन यांनी आता तरी जनतेशी खोटे बोलणे थांबवावे आणि स्वतःचे अपयश मान्य करत राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. जॉन्सन यांचे मुख्य खाजगी सचिव मार्टिन रेनॉल्ड्स नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पार्टीसाठी आमंत्रित करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या पार्ट्यांबाबतची माहिती उघड झाल्याने ब्रिटनमध्ये जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे.