
टीम इंडियामध्ये स्थान मिळवणं हे क्रिकेटवेड्या हिंदुस्थानातील अनेक खेळाडूंचे आजही स्वप्न आहे. असंच स्वप्न उराशी बाळगून दमदार कामगिरीच्या जोरावर जम्मू-कश्मिरच्या एका खेळाडूची टीम इंडियाच्या संघात निवड झाली होती. तसेच IPL मध्ये सुद्धा त्याने आपली छाप पाडली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आणि IPL मध्ये खेळणारा तो जम्मू कश्मिरचा पहिला खेळाडू होता. मात्र, आता त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.
जम्म-कश्मिरच्या 36 वर्षीय परवेज रसूसलने BCCI ला क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त घेतल्याची असल्याची माहिती दिली आहे. परवेजने आपल्या 17 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेट कारकिर्दीमध्ये 352 विकेट घेतल्या असून 5648 धावा केल्या आहेत. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियाच्या मुख्य संघात स्थान मिळालं. मात्र, त्याचा हा आंतरराष्ट्रीय प्रवास फक्त एक वनडे आणि एक टी-20 पूर्ता मर्यादित राहिला. सुरेश रैनाच्या नेतृत्वात त्याला देशासाठी खेळण्याची संधी मिळाली. बांगलादेशविरुद्ध त्याने टी-20 आणि इंग्लंडविरुद्ध त्याने वनडेमध्ये पदार्पन केलं होतं. परंतू परवेज रसूलला आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणावी तशी छाप पाडता आली नाही. IPL मध्ये 2012-13 च्या हंगामात पुणे वॉरियर्स संघाकडून खेळताना 594 धावा आणि 33 विकेट पटकावल्या होत्या.