
हिंदुस्थानी रेल्वेने एप्रिल महिन्यात काही ट्रेन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागातील गोंदिया स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 3 वर वॉशेबल एप्रन हटवून त्याजागी बॅलेस्टेड ट्रक लावले जात आहे. या इन्फ्रास्टक्चर अपग्रेडमुळे एप्रिलमध्ये काही ट्रेन रद्द केल्या आहेत.
बरोनी-गोंदिया एक्सप्रेस 5 ते 26 एप्रिलदरम्यान केवळ दुर्ग स्टेशनपर्यंत धावेल. दूर्ग आणि गोंदियादरम्यान ही ट्रेन रद्द केली आहे.
शालीमार-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 4 ते 24 एप्रिलपर्यंत शालीमारहून रद्द केली जाईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-शालीमार एक्सप्रेस 6 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनसहून रद्द असेल.
कोरबा-अमृतसर एक्सप्रेस 5 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत कोरबाहून रद्द केली जाईल. अमृतसर-बिलासरपूर एक्सप्रेस 7 ते 27 एप्रिलपर्यंत अमृतसरहून रद्द केली जाईल.
हजरत निजामुद्दीन-रायगड एक्सप्रेस
2, 4, 6, 7, 8, 9, 11, 13, 14, 15, 16, 18, 20, 21, 22
एप्रिलला हजरत निजामुद्दीनहून रद्द केली जाईल.
बल्लारशाह-गोंदिया एमईएमयू पॅसेंजर 5 ते 25 एप्रिलपर्यंत बल्लारशाहहून रद्द केली जाईल.
हजरत निजामुद्दीन-विशाखापट्टणम एक्सप्रेस 7, 9, 10, 11, 13, 14, 16, 17, 18, 20, 21, 23, 24, 25 एप्रिलला हजरत निजामुद्दीनहून रद्द असेल.
























































