पासपोर्टसाठी मुंबईच्या फेऱ्या पासून रत्नागिरीकरांची सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरी जिल्ह्यात पासपोर्ट कार्यालय व्हावे ही जिल्हयातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी शिवसेनेच्या प्रयत्नाने पुर्ण झाली आहे. रविवारी राजापूर तालुक्यातील डाक कार्यालयात पासपोर्ट कार्यालय सुरु झाले. पासपोर्टसाठी पूर्वी रत्नागिरीतून मुंबईला फेऱ्या माराव्या लागत त्या त्रासापासून रत्नागिरीकरांची सुटका झाली आहे.

राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयाच्या उद्धाटन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते आणि आमदार उदय सामंत जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी, आमदार राजन साळवी, , आमदार हुस्नबानू खलिफे, राजापूरचे नगराध्यक्ष जमिर खलिफे, क्षेत्रिय पोस्ट अधिकारी एन. विनोदकुमार, स्वाती कुलकर्णी, राजापूर तहसिदार आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले की, राजापूर पोस्ट ऑफीस येथे पासपोर्ट कार्यालय कार्यान्वीत झाल्याने जिल्हयातील नागरिकांचा वेळ, पैसा वाचणार असून आता नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जावे लागणार नाही. तसेच पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी व सिंधूदुर्ग या दोन्ही जिल्हयासाठी सुरु व्हावे यासाठी सर्व स्तरावरुन प्रयत्न करण्यात येत होते. प्रयत्नाला यश आले असून आता राजापूर येथील पोस्ट ऑफीस येथे पासपोर्ट कार्यालय कार्यान्वीत करण्यात आले आहे. राजापूर हे रत्नागिरी व सिंधूदुर्ग जिल्हयातील नागरिकांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे राजापूर येथील पासपोर्ट कार्यालयाचा दोन्ही जिल्हयातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले

रत्नागिरीत पासपोर्ट कार्यालय व्हावे अशी मागणी वारंवार माझ्याकडे येत होती. रत्नागिरीतून परदेशात जाणाऱ्यांची संख्याही खूप आहे याचा लेखाजोखा दिल्लीत मांडला.स्वता परराष्ट्रमंत्र्याकडे पाठपुरावा करताना अधिवेशनातही रत्नागिरीत पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याची मागणी केली त्यानंतर आज या पासपोर्ट कार्यालय राजापूरात सुरु होत असल्याचे सांगत शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी समाधान व्यक्त केले.

summary…passport office at ratnagiri