
बांगलादेशी नागरिकांची राजरोस हिंदुस्थानात घुसखोरी होत आहे. अशा या घुसखोर बांगलादेशींविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे. गेल्या वर्षभरात मुंबईतून एक हजार 61 घुसखोर बांगलादेशींना शोधून त्यांना हद्दपार केले आहे.
बांगलादेशी नागरिक मिळेल त्या मार्गाने हिंदुस्थानात घुसखोरी करत आहेत. विविध शहरांत पद्धतशीर सेटिंग लावून ते आसरा घेत आहेत. अशा बांगलादेशी घुसखोरांचा शोध घेऊन मुंबईसह महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची हकालपट्टी करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष 2025 मध्ये मुंबई पोलिसांनी तब्बल एक हजार 61 बांगलादेशी घुसखोरांना शोधून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. त्यामध्ये 453 पुरुष, 459 महिला, 129 बालके आणि 20 तृतीयपंथीय आहेत.


























































