गावठी बॉम्बने रानडुकराची शिकार करणाऱ्या चौघांना अटक, पाटण तालुक्यात वन विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी भागात वन विभागाच्या अधिकार्यांनी गस्त घालत असताना सणबुर-रुवले रस्त्यावर एका मोटारीची तपासणी केली असता, रान डुकराचे तुटलेले डोके व मांस आढळून आल्याने चौघांना अटक केली आहे. या दोघांनी फासेपारध्यांकडून गावठी बॉम्ब तयार करून रानडुकराची शिकार केल्याची कबुली दिली.

राजाराम गंगाराम गिजे (वय 39), गणेश सोमा परबते, मारुती निवृत्ती पवार (वय 40, तिघेही रा. नवे पारगाव, ता. हातकणंगले, कोल्हापूर), तुकाराम ज्ञानू साळुंखे (वय 38, रा. तारळे, ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राजाराम गिजे व गणेश परबते यांनी रुवले गावच्या हद्दीतील फासेपारध्यांकडून कापडी व प्लॅस्टिकचे बॉम्ब तयार करून घेतले. सदर बॉम्बच्या साहाय्याने रानडुकराची शिकार केली. रुवले येथील वन्यजीव तपासणी नाकासमोरील मालकी क्षेत्रातील माती बंधारेलगत रानडुकराची शिकार करून मांस वाटून घेतले होते. सदरचे मांस वाहनाद्वारे नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथे घेऊन जात असताना वन विभागाच्या अधिकाऱयांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, तुकाराम ज्ञानू साळुंखे (वय 38, रा. तारळे, ता. पाटण) यांच्याकडे पाहुणा म्हणून मारुती निवृत्ती पवार (रा. नवेपारगाव, ता. हातकणंगले) आले होते. दरम्यान, पाचवा आरोपी पळून गेला आहे. त्याचा शोध वन विभागाचे अधिकारी घेत आहेत.

सदर गुह्याचा तपास वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विकास काळे, वनपाल सुभाष राऊत, वनपाल डी. डी. बोडके, सळवे, अमृत पन्हाळे, घोटील, जयवंत बेंद्रे करीत आहेत.