व्हॉट्स अॅपला पतंजलीचे ‘किंभो’ देणार टक्कर; 27 ऑगस्टला पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

व्हॉट्स अॅपला टक्कर देण्यासाठी योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाचे स्वदेशी ‘किंभो अॅप’ 27 ऑगस्टला पुन्हा बाजारात येणार आहे. पतंजलीचे सहसंस्थापक आचार्य बालकृष्ण यांनी आज ट्विटरद्वारे याची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऍपचे लाँचिंग होणार आहे.  ‘किंभो अॅप’ या आधी मे महिन्यात लाँच केले होते, मात्र युजर्सना आलेल्या अडचणींमुळे ते प्ले स्टोअरमधून हटवण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही सुधारणा करून हे स्वदेशी ऍप पुन्हा हिंदुस्थानींसाठी अवतरणार आहे.