चोरट्याच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कडगाव तालुक्यातील पाथर्डी येथील मोहोज रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या कारभारी रामदास शिरसाट यांचा कापूस चोरट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. कारभारी हे त्यांच्या शेतातील घरी रहात होते. त्यांनी बाजुच्या पत्र्याच्या खोलीमध्ये वेचलेला कापूस गाठोडे बांधून ठेवला होता. शुक्रवारी रात्री चोरटे चोरी करण्याच्या हेतूने आले व काही गाठोडे त्यांनी काढून उसाच्या शेतात नेऊन ठेवले. व उर्वरीत गाठोडे खोलीतुन काढत असताना कारभारी शिरसाट यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले तर चोरटे कापूस घेऊन जात होते. याचवेळी चोरट्याची व शिरसाठ यांची नजरा नजर झाली. चोरट्यांच्या हे लक्षात आले चोरट्यांनी कारभारी शिरसाठ यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यामध्ये कारभारी शिरसाट हे जागीच गतप्राण झाले.

याप्रकरणी पाथर्डी चे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी घटनास्थळी भेट दिली. कारभारी शिरसाट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे तसेच अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्या नोंदवला गेला आहे. ळिंब व कापसाला चांगला भाव मिळत असल्यामुळे भुरट्या चोरांचे लक्ष आता डाळिंब आणि कापसाकडे वळले आहे त्यातून अशा घटना असल्याने शेतात राहणारे शेतकरी धास्तावले आहेत.