पाथर्डीत साडेनऊशे लिटर भेसळयुक्त दूध केले नष्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी शहरातील एका दूध विक्रेत्याकडील भेसळयुक्त साडेनऊशे लिटर दूध अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी नष्ट केले. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रदीप कुटे हे शेवगाव येथील तालुका दूध संघाच्या जागेत असलेल्या सनफ्रेश एप्रो इंडस्ट्रीजच्या दूध संकलन केंद्रात तपासणीसाठी गेले असता त्यांना तेथे पाथर्डी शहरातील विवेकानंद दूध संकलन केंद्रातून साडेनऊशे लिटर भेसळयुक्त दूध आल्याचे दिसून आले. या दुधाची इंडिफॉस मशिनवर तपासणी केली असता त्यामध्ये साखरेचे व आम्लतेचे प्रमाण जास्त आढळले. शिवाय दूध आणलेल्या कॅनला आतून कीटन असलेले प्लॅस्टिक आढळून आल्याने कुटे यांनी सर्व दूध नष्ट केले. सहायक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.