
बांगलादेशचा पहिला डाव 247 धावांत गुंडाळल्यानंतर श्रीलंकेच्या पथुम निस्सांकाने 146 धावांची जबरदस्त आणि अभेद्य खेळी करत दुसऱया कसोटीच्या दुसऱयाच दिवशी कसोटीवर पकड मिळवली. निस्सांकाने दिनेश चंडीमलसह दुसऱया विकेटसाठी 194 धावांची भागी रचली. निस्सांकाने आपले चौथे शतक झळकवले. मात्र चंडीमलचे 17 वे शतक अवघ्या 7 धावांनी हुकले. दिवसाचा खेळ संपायला 10 मिनिटे असताना चंडीमल बाद झाला. आता लंकेकडे 43 धावांची आघाडी असून कसोटीचे अद्याप तीन दिवस बाकी आहेत. पहिली कसोटी अनिर्णितावस्थेत सुटल्यामुळे दुसऱया कसोटीसह मालिका जिंकण्याचे श्रीलंकेचे ध्येय आहे