मुंबईत रुग्णसेवा सप्ताहाचे आयोजन

15

सामना प्रतिनिधी, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईत रुग्णसेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे. तसेच 27 जुलैपर्यंत मुंबईच्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांबाहेर मोफत फिरत्या दवाखान्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

सात दिवसांत मुंबईतील सात रेल्वे स्थानकांबाहेर मोफत फिरत्या दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 22 जुलै रोजी मानखुर्द स्थानकापासून या रुग्णसेवा सप्ताहाला सुरुवात झाली. त्यानतंर चेंबूर, वडाळा, शीव, माटुंगा आणि दादर या रेल्वेस्थानकांबाहेर मोफत दवाखान्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या दवाखान्यांमध्ये तज्ञ डॉक्टरांचे पथक रुग्णांची तपासणी आणि मोफत औषधे देणार आहे. या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन राहुल शेवाळे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या