
मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघातर्फे आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘पाऊले चालती…’ या विठ्ठल भक्तीपर गीतांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कलावंताच्या वैद्यकीय मदतीकरिता रविवार 6 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाटय़गृह येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुनील राऊत आणि विवेक नागवेकर यांच्या माध्यमातून बॉम्बे बिट्सचे अर्जुन मुद्दा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. मंगला खाडिलकर यांना यावेळी जीवनगौरव पुरस्कार देऊन या सोहळ्यात सन्मानित करण्यात येणार आहे.