
तालुक्यातील श्री पावणाई मंदिरातील दान पेटी चोरी करणारा अट्टल गुन्हेगार सतीश मुरलीधर झाजम यास अटक करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी 1.30 च्या सुमारास देवगड पोलिसांनी तळवडे मार्गावरील जंगलमय भागातून आरोपी पलायन करीत असताना पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले .
देवगड तालुक्यातील पावणाई मंदिरातील फंड पेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास करून पलायन केले होते .देवगड पोलिसांनी या घटनेनंतर पोलीस शिपाई राजकुमार आगाव ,पोलीस नाईक प्रशांत जाधव, पोलीस नाईक अमित हळदणकर,, मिलिंद परब यांनी पाठलाग करून त्याला जंगलंय भागातून ताब्यात घेऊन अटक केले आहे व त्यांचेकडुन मुद्देमाल हस्तगत केला व चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.






























































