
सामना ऑनलाईन । मुंबई
काही दिवसांपूर्वी थोर समाजसुधारक राजा राम मोहन रॉय यांच्याविषयी अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर पायल रोहतगी आता पुन्हा बरळली आहे. मात्र, यावेळी तिने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन देताना ‘शिवाजी महाराज हे मूळ क्षत्रिय कुळाचे नाहीत, तर त्यांचा जन्म शूद्र जातीत झाला होता’ तिने म्हटलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. तिने ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरही ही पोस्ट शेअर केली आहे.
Being from a family of farmers & belonging to #Shudra Varna is not a #crime. Some say that #ShivajiMaharaj was from #Kshtriya Varna which is also OK. But Hindu Indians should know REAL facts about their KING. Why Marathas given #Reservation quota in Maharashtra? #MondayThoughts pic.twitter.com/qEDhuZSjZG
— PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM (@Payal_Rohatgi) June 3, 2019
पायलने इन्स्टाग्रामवर पती संग्राम सिंगसोबतचा फोटो शेअर करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिलं? असा प्रश्न विचारत तिने मराठा आरक्षणाविषयीही मुक्ताफळं उधळली आहेत.




























































