
पेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. पेटीएमच्या आयपीओसाठी ज्यांनी मोठ्या अपेक्षेने गुतंवणूक केली होती, त्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. लिस्टिंग झाल्यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण होत आहे. आयपीओ आल्यानंतर या शेअरचे भाव वधारतील, अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरल्याने गुतवणूकदारांचे नुकसान झाले आहे.
पेटीएमचा शेअर वधारण्याची अनेक गुतंवणूकदार वाट बघत आहेत. शेअर बाजार तेजीत असूनही पेटीएमच्या शेअरमध्ये घसरण सुरुच आहे. आतापर्यंत या शेअरचे सर्व निच्चांक मोडीत निघाले आहेत. सर्व ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार या शेअरसाठी 1200 रुपयांचे टार्गेट देण्यात आले होते. मात्र, या शेअरने सगळ्यांचीच निराशा केली आहे.
नवीन वर्षात हा शेअर चांगली कामगिरी करेल, अशी गुंतवणूकदारांना अपेक्षा होती.मात्र, नव्या वर्षात हा शेअर दररोज नवीन निचांक करत आहे. हा शेअर 50 दिवसात 1200 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे. या शेअरच्या घसरणीमुळे गुतंवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारीही हा शेअर घसरण होत 1228 रुपयांवर आला होता. त्यानंतर दुपारच्या सत्रआत 12.50 मिनिटांनी तो 1200 रुपयांच्या खाली घसरला आहे. या शेअरमध्ये 3.70 टक्क्यांची घसरण होत तो 1,185.05 रुपयांवर आला आहे.
या शेअरचे लिस्टिंग 18 नोव्हेंबर 2021 रोजी झाले होते. त्यावेळी त्याची इश्यू मूल्य 2150 होते. ते आता 1200 रुपयांपर्यंत कमी झाले आहे. लिस्टिंगच्या दिवशीच या शेअरच्या किंमतीत 965 रुपये घसरण झाली होती. ज्यांना आय़पीओचा एक लॉट मिळाला होता, त्या गुतंवणूकदारांचे सुमारे 5 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनी सातत्याने तोट्यात असल्याने तिच्या शेअरमध्ये घसरण होत असल्याचे सांगण्यात येत आहे.




























































