#Article370 पीडीपीच्या खासदारांनी संविधानाची प्रत फाडली, देशभरातून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-कश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याची शिफारस केल्यानंतर संसदेमध्ये गोंधळ उडाला. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी भाजपाने राज्यघटनेची हत्या केल्याचे म्हटले. याच दरम्यान जम्मू-कश्मीरमधील राजकीय पक्ष पीडीपीचे खासदार नजीर अहमद लावे आणि एमएम फयाज यांनी संसद परिसरामध्ये संविधानाची प्रत फाडून निषेध व्यक्त केला.

पीडीपीच्या दोन्ही खासदारांचे हे कृत्य चुकीचे असल्याची टीका देशभरातून होत आहे. गुलाम नबी आझाद यांनी संविधान फाडणाऱ्या पीडीपीच्या खासदारांचा निषेध नोंदवला. संविधान फाडण्याच्या या कृतिचा संसदेही निषेध व्यक्त करण्यात आला आणि दोन्ही खासदांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगण्यात आले. याचा निषेध म्हणून एमएस फयाज यांनी आपला कृर्ता फाडला.