गाझामध्ये लवकरच शांतता प्रस्थापित होईल! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच एक घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर इस्रायल आणि हमास शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की इस्रायल आणि हमास यांनी गाझा शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमती दर्शविली आहे. ते म्हणाले की इस्रायल आणि हमास यांनी शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. हा करार गाझामध्ये सुरू असलेले युद्ध थांबवेल. महत्त्वाचे म्हणजे, युद्धबंदीबरोबरच कैद्यांची सुटका केली जाईल. गुरुवारी (९ ऑक्टोबर) इजिप्तमध्ये झालेल्या करारावर हमासने सहमती दर्शवली आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ट्रुथआउट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट अंतर्गत ते म्हणतात,”मला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की इस्रायल आणि हमास दोघेही आमच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत. याचा अर्थ असा की सर्व ओलिसांना लवकरच सोडले जाईल आणि इस्रायली सैन्य एका निश्चित सीमेवर माघार घेईल. हे कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने पहिले पाऊल आहे.”

इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी सोशल मीडियावर म्हटले की, ‘इस्रायलसाठी हा एक महान दिवस आहे. उद्या मी सरकारला या कराराला मान्यता देण्याचे आणि आमच्या सर्व प्रिय ओलिसांना परत आणण्याचे आवाहन करेन. मी आयडीएफ आणि सर्व सुरक्षा दलांच्या शूर सैनिकांचे आभार मानतो ज्यांच्या धैर्याने आणि बलिदानामुळे आम्हाला या टप्प्यावर पोहोचता आले. आमच्या ओलिसांना सोडण्याच्या या पवित्र मोहिमेत योगदान दिल्याबद्दल मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या टीमचे मनापासून आभार मानतो. देवाच्या कृपेने, एकत्रितपणे आपण आपली सर्व उद्दिष्टे साध्य करत राहू आणि आपल्या शेजाऱ्यांसोबत शांतता वाढवत राहू.”