
कोकण रेल्वे मार्गावर पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्याने काही दिवस वाहतूक बंद होती. त्यामुळे मडगावडे जाणार्या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. बोगद्यातील काम पूर्ण झाले असून हा मार्ग सुरळीत झाला आहे. कोरोना वेळापत्रकानुसार धावणार्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या काळात रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मध्य रेल्वेच्या काही मोजक्याच गाड्या आणि मालवाहतूक करणार्या गाड्या या मार्गावर सुरु होत्या.
काही दिवसांपुर्वी पेडणे येथील बोगद्यात दरड कोसळल्यामुळे वाहतूक मिरज मार्गे वळवण्यात आली होती. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली आहे. एर्नाकुलम निजामुददीन स्पेशल एक्स्प्रेस मडगाव ते कल्याण, निजामुददीन एर्नाकुलम दुरांतो स्पेशल, नवी दिल्ली तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक ते तिरुअनंतपुरम स्पेशल एक्स्प्रेस या गाड्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार मार्गस्थ होणार आहेत.






























































