पेण येथे बँक ऑफ बडोदाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

229

गुरुवारी पहाटे 4.30 च्या सुमारास काही अज्ञात तरुण एटीएमचा दरवाजा उघडून आत शिरले आणि त्यांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, सकाळी 6.30 च्या सुमारास डॉक्टर शेखर धुमाळ हे आपल्या दवाखान्यात जात असताना त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी एटीएम जवळ जाऊन बघितले. तेव्हा चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती जवळच असणां-या दादर सागरी पोलिसांना दिली . त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांनीही घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. आणि पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या. याप्रकरणी दादर सागरी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या