बीड जिल्हापरिषदेच्या शिपायाचा निर्घृण खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, बीड

बीड जिल्हापरिषदेतील शिपाई एकनाथ अण्णा मिटकरी (वय-४७) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. घरात दुर्गंधी सुटल्याने हा प्रकार उघडकीस आला. मिटकरी हे बीड शहरातील गांधीनगर मध्ये रहात होते. तीन मुली , एक मुलगा आणि पत्नी असा त्यांचा असा परिवार आहे. मिटकरींची हत्या झाली तेव्हा घरी कोणी नव्हतं. पोलीस त्यांची हत्या कोणी केली असावी याचा शोध लावण्यासाठी कामाला लागले आहेत.

मिटकरी यांच्या दोन्ही मुलींचे लग्न झाले आहेत. त्यांची एक मुलगी आष्टी इथे रहात असून एकनाथ मिटकरी वगळता त्यांचं संपूर्ण कुटुंब या मुलीकडे एका लग्नासाठी गेलं होतं. गेले आठ दिवस त्यांचे कुटुंबीय मुलीच्या घरी होते. मिटकरी यांच्या शेजाऱ्यांना काल रात्रीपासून त्यांच्या घरातून दुर्गंधी येत होती. आज सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना मिटकरींचा मृतदेह दिसला. त्यांच्या शरिरावर असंख्य जखमा दिसून आल्याने त्यांचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याचं निष्पन्न झालं आहे.