
सामना ऑनलाईन, मुंबई
घे भरारी कला-क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवअंतर्गत मुंबई उपनगर विभाग निमंत्रित मल्लखांब स्पर्धा जवाहर विद्या भवन, आरसीएफ कॉलनी,चेंबूर येथे पार पडली. या स्पर्धेला युवकांचा दणदणीत प्रतिसाद लाभला. पार्लेश्वरचे मुख्य प्रशिक्षक गणेश देवरुखकर, सह प्रशिक्षक चेतन पटेल, प्रशांत पटेल, अक्षय आणि अदिती यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी शानदार कामगिरी केली हे विशेष. युवा खेळाडूंचे यावेळी कौतुक करण्यात आले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
:-सर्वोकृष्ट मल्लखांब स्पर्धा मुले
1) रिषभ घुबडे :- दुसरा क्रमांक-रौप्य पदक
:-सर्वोकृष्ट दोरीचा मल्लखांब स्पर्धा मुली
1) तनश्री जाधव :-दुसरा क्रमांक-रौप्य पदक
2) देवांशी पवार :-तिसरा क्रमांक-कास्य पदक
12 वर्षांखालील मुले – 1)आदि वायंगणकर – पहिला क्रमांक-सुवर्ण पदक 2)वेदांत जावळे – दुसरा क्रमांक-रौप्य पदक
12 वर्षांखालील मुली – 1)तनश्री जाधव – पहिला क्रमांक-सुवर्ण पदक 2) देवांशी पवार – दुसरा क्रमांक-रौप्य पदक
14 वर्षांखालील मुले – 3) श्रवण काळे – तिसरा क्रमांक-कांस्य पदक
17 वर्षांखालील मुले -1) रिषभ घुबडे – प्रथम क्रमांक-सुवर्ण पदक
























































