चुकीचे बोललो नाही, माफी मागणार नाही!

690

दक्षिणेतील द्रविडी चळवळीचे नेते पेरीयार रामास्वामी यांच्याबद्दल सुपरस्टार रजनीकांत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून आज मंगळवारी तामीळनाडूतील विविध संघटनांनी रजनीकांत यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला. इतकेच नाही तर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली आहे. असे असतानाही रजनीकांत यांनी मात्र आपण जे बोललो त्यात चुकीचे काहीच नव्हते. त्यामुळे आपण माफी मागणार नाही असे ठामपणे म्हटले आहे. पेरीयार ई. व्ही. रामास्वामी हे हिंदू देवतांवर कठोर शब्दांत टीका करायचे. 1971 साली एका सभेत राम आणि सीता यांची आक्षेपार्ह छायाचित्रे झळकवण्यात आली होती त्यावर कुणी काहीच बोलले नाही असा दावा रजनीकांत यांनी केला होता. ‘तुघलक’ या तमिळ मासिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पेरीयार यांच्याबद्दलची भूमिका मांडली होती.

आपली प्रतिक्रिया द्या