शेतकऱ्यांना घरगुती, शेतीच्या कामासाठी पाच ब्रास वाळू काढण्याची मुभा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

वाळू उत्खननावर राज्य सरकारने निर्बंध आणले आहेत. मात्र शेतकऱयांसाठी हे नियम शिथिल करीत राज्य सरकारने पाच ब्रास वाळू उत्खननाची मुभा दिली आहे. याविषयीची अधिसूचना काढण्यात आली असून तहसीलदार, जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन वाळू उपसा करता येणार आहे. वाळू उपशावर आणण्यात आलेल्या निर्बंधामुळे ग्रामीण भागात घरबांधणी, विहिर बांधणी यासारख्या कामांवरही बंधने येत होती.

हे निर्बंध शिथिल व्हावेत यासाठी पावसाळी अधिवेशनात मागणी करण्यात आली होती. त्यानुसार घुरगुती किंवा शेतीच्या कामासाठी पाच ब्रासपर्यंत वाळू उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आल्याची अधिसूचना सरकारने जाहीर केली. विशेष म्हणजे यासाठी कोणतीही फी किंवा रॉयल्टी आकरू नये अशा सूचनाही राज्य सरकारने दिल्या आहेत. यासाठी तहसीलदाराकडे अर्ज करावा लागणार असून त्यानंतर 15 दिवसांच्या आत लेखी परवानगी दिली जाणार आहेत.

summary- permission for sand mining till five bras for farmers