
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशभरात आता कुठेही ड्रोन उडवता येणार आहे. नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी हा धाडशी निर्णय घेतला असून 1 डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रालयाने आज याबाबतचे आदेश आणि नियमावली जारी केली.
नव्या नियमावलीनुसार ड्रोन केवळ दिवसा उडवण्यास परवानगी मिळणार असून जास्तीत जास्त 40 फूट उंचावरच ते उडवावे लागतील. प्रत्येक ऑपरेटरला आपला ड्रोन डिजिटली रजिस्टर्ड करावा लागेल. मोबाईल ऑप्लिकेशनद्वारे प्रत्येक ड्रोन रजिस्टर करता येईल. रेड झोनमध्ये विमान वाहतुकीला परवानगी नसते, यलो झोनमध्ये हवाई क्षेत्र निर्बंधित असते तर ग्रीन झोन हा सर्वांसाठी खुला असतो. यलो झोनमध्ये ड्रोन उडविण्यासाठी काही खास परवानग्या घ्याव्या लागणार आहेत.
summary- permission granted for drone from 1st December

























































