
जोगेश्वरी पश्चिमेकडे बिबट्याचे कातडे विकण्यासाठी घेऊन आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट-8 च्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्या तरुणाकडून दहा लाख किमतीचे बिबट्याचे कातडे हस्तगत केले.
युनिट-8 चे कॉन्स्टेबल प्रदीप घरत यांना खबर मिळाली की, देवगडच्या चोपडे गावचा एक रहिवासी बिबट्या वाघाचे कातडे विकण्यासाठी जोगेश्वरी पश्चिमेकडे येणार आहे. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून सॅक बॅगेत बिबट्याचे कातडे घेऊन आलेल्या इसमाला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यावर बिबट्याचे कातडे सापडले.























































