
सोशल मीडियावर दरदिवशी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. एका व्यक्तीने व्यायाम करण्याचा कळसच गाठला आहे. या व्यक्तीने व्यायाम करण्यासाठी अशी जागा निवडली ज्याची कोणी कल्पनाच करु शकत नाही. जिथून खाली पडला असता तर काहीही होऊ शकले असते.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती खतरनाक जागेवरुन लटकट व्यायाम करताना दिसत आहे. ही व्यक्ती हायवेवर असलेल्या दिशादर्शक आणि अंतर दाखवणाऱ्या बोर्डवर लटकून व्यायाम करत होता. हा बोर्ड उंचावर दिसत आहे. सध्या तरी ही व्यक्ती बोर्डावर कशी पोहोचली याबाबत कोणालाच काही माहित नाही. हा व्यक्ती दोन्ही हाताने बोर्डाच्या लोखंडाला पकडून लटकत व्यायाम करत होता. मात्र तो कुठेही त्यात घाबरलेला दिसत नाहीय.
हा व्हिडीओ royalcarsz नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. 12 सेकंदाचा हा व्हि़डीओ पाहून लोकं हैराण होत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला 10 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हि़डीओला हजारो लोकांनी लाईक्स केले आहे. एका यूजरने लिहीलेय याला आणखी कोणती जागा मिळाली नाही का?, खाली पडला तर हाता पायांचा भुसा होऊन जाईल. अनेकजण त्या व्यक्तीला मूर्ख म्हणत आहेत.
View this post on Instagram




























































