बाथरूम शॉवरमध्ये कॅमेरा लपवून काढायचा न्यूड व्हिडीओ, डॉक्टरच्या मुलाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाथरूम शॉवरमध्ये कॅमेरा लपवून तरुणींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या एका डॉक्टरच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे अशा व्हिडीओंनी भरलेल्या 9 हार्ड डिस्क सापडल्या आहेत.

ही घटना उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे घडली आहे. येथे खरे नावाचे एक डोळ्यांचे डॉक्टर प्रसिद्ध आहेत. त्यांचा मुलगा आशीष याने त्यांच्या तीन मजली घराच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर एक गर्ल्स हॉस्टेल सुरू केलं होतं.

तो फक्त तरुणींनाच खोली भाड्याने देत असे, त्यासाठी भाड्याचे दरही कमी ठेवत असे. पण, त्यामागे त्याचा एक हेतू होता. त्याने तिथल्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. त्यातून तो तरुणींचे व्हिडीओ बनवत असे. एक दिवस एका तरुणीने शॉवरमधून पाणी नीट येत नसल्याने शॉवर तपासला. तेव्हा, त्यातून पाणी येत नसल्याने तिने तो उघडून पाहिला.

त्यात लपवलेला कॅमेरा तिथे दिसून आला. तिने तो कॅमेरा पोलिसात जमा केला. त्यावरून पोलिसांनी आशीषच्या घरावर धाड टाकली. तिथे त्यांना 9 हार्ड डिस्क, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर, कॉम्प्युटर आणि काही आक्षेपार्ह साहित्य आढळलं. यासोबत एक डायरीही आढळली, जिच्यात अनेक तरुणींचे फोन नंबर लिहिले होते. त्यामुळे आशीष या व्हिडीओद्वारे तरुणींना ब्लॅकमेल करत असावा असा अंदाजही पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी आशीषला अटक केली आहे.