
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
मुंबई हायकोर्टाने मल्टिप्लेक्स चालकांना फटकारल्यानंतर जम्मू-कश्मीर हायकोर्टानेही मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाणे घेऊन जाण्यास परवानगी दिली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती आर. एफ. नरिमन आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठामुळे मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने दाखल याचिकेची सुनावणी झाली. यावेळी असोसिएशनचे वकील मुकुल रोहतगी म्हणाले, हायकोर्टाचा आदेश चुकीचा आहे. ताज हॉटेलमध्ये मी दारूची बाटली घेऊन गेलो आणि तेथे फक्त सोडा ऑर्डर केला तर चालेल का? सुप्रीम कोर्टात आता सहा आठवडय़ानंतर सुनावणी होणार आहे.




























































