हिंदुस्थानात महागाईने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून या संकटात इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दोन वर्षे कोरोनामुळे अडचणीत आलेले नागरिक आता दररोज भाववाढीमुळे त्रस्त होत आहे. गेल्या पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. शनिवारीही तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांची वाढ केली आहे. आता दिल्लीत पेट्रोल 98.61रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 89.87 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. यापूर्वी 22,23 आणि 25 मार्च रोजी 80-80 पैशांची वाढ झाली होती. पाच राज्यांतील निवडणुका संपल्याबरोबर तेलाच्या किमती वाढवण्याची प्रक्रिया सुरू झाली.
देशात पाच महिने स्थिर असलेल्या किमती अचानक वाढल्याने सर्वसामान्य चिंतेत सापडला आहे. रशिया- युव्रेâन युद्धाच्या पाश्र्वभूमीवर अन्नधान्य व किराणा मालात 10 ते 12 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 22 मार्चपासून आतापर्यंत एलपीजी आणि सीएनजी, पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. घरगुती गॅसच्या दरातही 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. 23 मार्च रोजी दुसNयांदा पेट्रोल आणि डिझेल 80-80 पैशांनी महागले. 24 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, सीएनजी-पीएनजीच्या किमती 1 रुपयापर्यंत महागल्या होत्या. 25 मार्च रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली होती. 26 मार्च रोजी चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
कशा ठरतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती?
जून 2010 पर्यंत सरकार पेट्रोलचे दर ठरवत असे आणि दर 15 दिवसांनी त्यात बदल होत असे. 26 जून 2010 नंतर सरकारने पेट्रोलचे दर ठरवण्याचे काम तेल कंपन्यांवर सोडले. त्याचप्रमाणे ऑक्टोबर 2014 पर्यंत डिझेलचे दरही सरकारने निश्चित केले होते. 19 ऑक्टोबर 2019 पासून सरकारने हे काम तेल कंपन्यांकडे सोपवले. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, पेट्रोल आणि डिझेलचा वाहतूक खर्च आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन तेल कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत ठरवतात.




























































