
उत्तर प्रदेशमध्ये दोन नेत्यांनी पेट्रोल पंपवरून वारंवार पेट्रोल भरले. त्याचे बिल 22 लाख रुपये झाले. हे बिल त्यांनी न भरल्याने मॅनेजरने आत्महत्या केली आहे.
उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद शहरात सोमवीर तोमर आणि प्रमोद तोमर हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. दोघे गाझियाबादमधील एका पेट्रोल पंपवरून नेहमी पेट्रोल भरायचे. या पेट्रोल बिल तब्बल 22 लाख रुपये झाले होते. हे बिल भरण्यास दोघांनी नकार दिला. त्यामुळे पेट्रोल पंपचे मॅनेजर रामपाल यांनी आत्महत्या केली. रामापाल यांचे वय 65 होते. तसेच ते मूळचे बिहारचे रहिवासी होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून या दोन्ही नेत्यांची नाव घेतले आहे.
पोलिसांनी रामपाल यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.


























































