खूशखबर! एकच खाते सुरू ठेवल्यास लाभ, पीएफ खातेधारकांना मिळणार 50 हजार रुपये!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओ सदस्य असलेल्या नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठी घोषणा केली. पीएफ खाते एकाच नंबरवर 20 वर्षे सुरू ठेवल्यास त्या नोकरदाराला 50 हजार रुपयांपर्यंतचा बोनस मिळू शकणार आहे. नोकरदार वर्गांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. पीएफ खातेदारांनी एकाच खात्यात सलग 20 वर्षे योगदान दिल्यानंतर लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिट्सचे फायदे मिळण्याची संधी आहे. सीबीडीटीने 20 वर्षांपासून ईपीएफ खात्यात नियमित योगदान देणाऱ्या खातेदारांना लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिट्सचे लाभ देण्याची शिफारस केली होती, ज्याला केंद्र सरकारनेही हिरवा पंदील दाखवला होता. त्यामुळे 20 वर्षे योगदान देणाऱया कर्मचाऱयांना 50,000 रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळू शकणार आहे.

कोणाला किती लाभ

पाच हजार रुपयांपर्यंत मूळ वेतन असलेल्या व्यक्तींना 30,000 रुपयांचा लाभ मिळतो. 5,001 ते 10,000 रुपये वेतनधारकांना 40,000 रुपये मिळतात. तर 10 हजार रुपयांपेक्षा जास्त मूळ वेतन असलेल्या व्यक्ती 50,000 रुपयांच्या लाभासाठी पात्र ठरतात.

लाभासाठी काय करावे?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी ईपीएफओ सदस्यांनी नोकरी बदलल्यानंतर सुद्धा एकाच पीएफ खात्यात पीएफचे योगदान देणे सुरूच ठेवावे. विद्यमान पीएफ खाते सुरू ठेवण्याच्या निर्णयाबद्दल पूर्वीच्या आणि सध्याच्या दोन्ही नियोक्त्यांना माहिती देऊन योगदानाचे सातत्य सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. ईपीएफओ सदस्यांना त्यांचे सेवानिवृत्ती लाभ वाढवण्याची आणि संस्थेद्वारे ऑफर केलेल्या लॉयल्टी-कम-लाइफ बेनिफिट्सचा लाभ घेण्याची संधी आहे. त्यानंतरच त्या व्यक्तीला 50 हजार रुपयांचा बोनस मिळेल.