
सामना प्रतिनिधी । उदगीर
उदगीर येथील गायक व कलावंत तथा श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे संगीत विभागाचे विभागप्रमुख प्रा. कृष्णा अनवले यांना पीएचडी मिळाली असून संगीत क्षेत्रातील उदगीर तालुक्यात ही पहिलीच पीएचडी आहे. स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाने नुक्तीच प्रा. कृष्णा रामदास अनवले यांनी पीचडी प्रदान केली आहे.
प्रा. अनवले हे उदगीर येथील जेष्ठ शास्त्रीय गायक व कलावंत असून ते श्री हावगीस्वामी महाविद्यालयामध्ये संगीत विभागाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांनी शास्त्रीय संगीतातील पारंपारिक घराणेदार, नवरचित बंदीशींचे सांगितिक दृष्टीकोनातून परिशालन एक चिकित्सक अभ्यास हा विषय घेऊन मुंबई येथील डॉ. अनया थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली आहे. ही पीएचडी उदगीरच्या कला क्षेत्रातील ही पहिलीच पीएचडी आहे. प्रा. अनवले हे नांदेड विद्यापिठाचे संगीत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असून त्यांना आकाशवाणीचा B-Hi94 दर्जाही प्राप्त आहे. या गायनाचे अनेक कार्यक्रम राज्याबाहेर झाले असून त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. गुणवंतराव पाटील, उपाध्यक्ष बाबुराव डोणगावकर, सचिव शिवकुमार हसरगुंडे, सहसचिव शंकरप्पा हरकरे, प्राचार्य प्रा. डॉ. पी. ई विभुते, उपप्राचार्य सौ. सुनिता लोहारे, प्रा. डॉ. ईश्वर शेरे, प्रा. डॉ. संजय एकंबेकर, प्रा. डॉ. राजेश्वर पाटील,प्रा. डॉ. गणेश होणराव, प्रा म. ई तंगावार राम मोतीपवळे, बसवेश्वर डावळे आदींनी अभिनंदन केले आहे.






























































