
विजय देवरकोंडा रश्मिका मंदाना हे दोघे 26 फेब्रुवारीला लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानच्या उदयपूर येथे दोघांचे कुटुंब आणि निवडक मित्रमंडळीच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे. प्री-वेडिंग कार्यक्रम 24 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 26 फेब्रुवारीला लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नासाठी खूपच निवडक लोकांना बोलावले जाणार आहे. लग्नात फोन आणि भेटवस्तू आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट इंडस्ट्रीजमधील लोकांसाठी 4 मार्चला हैदराबादला रिसेप्शन ठेवले जाणार आहे.






















































